बीड, परभणीत #CAA , #NRC विरोधातील आंदोलनाला हिंसक वळण

नागरिकत्व सुधारणा कायदा (#CAA) आणि #NRC बिल विरोधात पुकारण्यात आलेल्या बीड बंद आंदोलनाला हिंसक वळण लागलं. छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमावाकडून दगडफेक करण्यात आली. संतप्त जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. दंगल नियंत्रण पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. पोलिस कुमकही वाढवण्यात आली आहे.

शहरातील बशीर गंज, भाजीमंडई, राजुरी वेस, डीसीसी बँकेत परिसरातही दगडफेक करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण शहरात तणाव निर्माण झाली आहे. पोलीस (Police) बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

बीड बंदला गालबोट

एनआरसी-सीएए कायद्याविरोधात शुक्रवारी बीड बंदची हाक देण्यात आली.

मात्र दुपारी या ‘बीड बंद’ला गालबोट लागलं.

जमावाने छत्रपती शिवाजी महाराज चौकात अचानक दगडफेक केली.

जमावाला पांगवण्यात अखेर पोलिसांना यश आलं. तरीही परिस्थिती तणावपूर्ण असून पोलिस लक्ष ठेवून आहेत.

परभणीतही आंदोलनाला हिंसक वळण

परभणी येथेही CAB आणि NRC विरोधात शांततेत सुरू असलेल्याला आंदोलनाला हिंसक वळण लागलं. काही समाजकंटकांनी आंदोलनादरम्यान दगडफेक केली. महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाडीवर दगडफेक केली. तसंच पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी घटनेवर नियंत्रण मिळवलं. मात्र शांततेत सुरू असलेल्या या मोर्च्यात ज्या समाजकंटकांनी हिंसा केली, त्यांना शोधून कठोर शिक्षा करावी अशी मागणी सामान्य लोक करत आहेत.

Exit mobile version