Wed. Aug 10th, 2022

नवी मुंबईतल्या घणसोलीत दोन गटात तुंबळ हाणामारी

नवी मुंबई घणसोली येथली सोसायटीमध्ये शुक्रवारी रात्री तुंबळ हाणामारीचा प्रकार घडला. घणसोलीमधील माऊली कृपा या सोसायटीमध्ये संचालकपदाची निवडणूक पार पडत आहे, यात प्रीवर्तन आणि उन्नत्ती पॅनल आमने सामने असून, सोसायटीमध्ये तणावाचे वातावरण आहे.

सोसायटीमध्ये माघी गणेशोत्सवाचे आयोजन केल होते. यावेळी सोसायटी बाहेरून आलेल्या तरुणांनी सोसायटीमधील दिलीप चिकणे यांना बेदम मारहाण केली. त्यात ते गंभीर जखमी झाले असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. ही मारहाण परिवर्तन पॅनलचे सौरभ शिंदे यांच्याकडून करण्यात येत असल्याचा आरोप उन्नत्ती पॅनलने केला आहे. याबाबत पोलिसांनी मारहाण करणाऱ्या कार्यकर्ते विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.