Thu. May 19th, 2022

गणेशोत्सवात या आमदारावर झाला पैशांचा वर्षाव…पाहा हा व्हायरल व्हिडीओ

काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री नसीम खान यांच्यावर गणेश मंडळातील कार्यकर्त्यांनी पैसे उडवण्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

काँग्रेस आणि विरोधी पक्ष एकीकडे पेट्रोल डिझेल दर वाढ,नोटबंदी फसली,बेरोजगारी यावरून केंद्र आणि राज्य सरकार विरोधात आंदोलन करत आहेत. पण नोटा उडवताना आणि अंगावर पडत असताना नसीम खान मात्र हसत हसत पैश्याच्या पावसात उभे असलेले दिसतात. त्यांनी या कार्यकर्त्याना थांबवण्याचे प्रयत्न सुद्धा केलेले दिसंत नाही.

गणेशोत्सव सुरू असल्याने नेते मंडळी घरगुती आणि सार्वजणिक गणेश मंडळांना भेटी देत आहेत. नसीम खान हे घाटकोपर पश्चिम येथे असलेल्या हिमालय गणेश मंडळाच्या गणपती दर्शनाला गेले असताना त्यांच्यावर पैसे उडवतानाचा हा व्हिडिओ सोशल  मीडियावर व्हायरल झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.