Man Build Taj Mahal For wife
Edited Image, Instagram
Mini Taj Mahal Viral Video: मध्य प्रदेशातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ताजमहालसारखे दिसणारे एक भव्य घर दाखवले आहे. हे घर केवळ त्याच्या भव्य रचनेमुळेच चर्चेत नसून त्यामागील प्रेमळ हेतूनेही सर्वांचे मन जिंकत आहे. हा व्हिडिओ कंटेंट क्रिएटर प्रियम सारस्वत यांनी इंस्टाग्रामवर शेअर केला आहे ज्यामध्ये ते उद्योगपती आनंद प्रकाश चौकसे यांचे 4 बीएचके आलिशान संगमरवरी घर दाखवत आहेत. व्हिडिओच्या सुरुवातीला प्रियम विचारतो की, ताजमहालसारखी दिसणारी ही इमारत खरोखर तुमचे घर आहे का? आणि ती तुमच्या पत्नीला समर्पित आहे का? यावर जोडपे हसत हसत उत्तर देतात, 'अगदी, 100 टक्के तिला समर्पित आहे आणि आमचे प्रेम नेहमीच आमच्यासोबत आहे.'
व्हिडिओमध्ये दिसणारा हा मिनी ताजमहाल मूळ ताजमहालचा एक तृतीयांश स्केल मॉडेल आहे, जो आग्रा येथील मूळ ताजमहालमध्ये वापरल्या जाणाऱ्या मकराना संगमरवरापासून बनवला आहे. आजूबाजूला सुंदर कोरीवकाम, गोल घुमट आणि कमानीदार दरवाजे यामुळे हे खर खूपचं आकर्षक दिसत आहे. हे अनोखे घर आनंद चौकसे यांनी स्थापन केलेल्या शाळेच्या कॅम्पसमध्ये बांधले आहे.
हेही वाचा - अविश्वसनीय! अहमदाबाद विमान अपघातातून वाचलेल्या प्रवाशाचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल
प्रियम सारस्वत यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, हे जोडपे स्वतः या घराची एक छोटीशी झलक दाखवतात. प्रियमने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'हे सुंदर घर इंदूरजवळ आहे आणि प्रेमाचा संदेश देण्याच्या उद्देशाने ते बांधले गेले आहे. सर्वात खास गोष्ट म्हणजे ते एका शाळेच्या आत बांधले गेले आहे, जे @anand.prakash.chouksey ने सुरू केले आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 5.9 दशलक्षाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. लोक त्यावर उघडपणे प्रतिक्रिया देत आहेत.
हेही वाचा - चमत्कार म्हणावा की...योगायोग! 27 वर्षात दोन विमान अपघात केवळ 11 A सीटवर बसलेल्या प्रवाशाचा वाचला जीव
दरम्यान, एका वापरकर्त्याने लिहिले, मी या वर्षी यापेक्षा रोमँटिक काहीही पाहिले नाही. तसेच आणखी एका युजरने म्हटलं आहे की, हे फक्त एक घर नाही, तर संगमरवरात लिहिलेली एक जिवंत कविता आहे. अनेकांनी या कृतीला प्रेरणादायी म्हटले. सध्या या मिनी ताजमहालाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.