Sunday, April 20, 2025 05:19:44 AM

तुम्हाला माहीत आहे, 'या' 5 लोकांच्या मृतदेहांचं काशीत दहन होत नाही? 'हे' आहे कारण

अनेक हिंदू धर्मीयांच्या मनात आपल्याला काशीमध्ये मरण यावं, इथं आपल्यावर अंत्यसंस्कार व्हावे अशी इच्छा असते. या कारणाने बरेच लोक त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या काळात काशीला जाऊन राहतात.

तुम्हाला माहीत आहे या 5 लोकांच्या मृतदेहांचं काशीत दहन होत नाही हे आहे कारण

नवी दिल्ली : हिंदू धर्मीयांच्या मनात आपल्याला इथं मरण यावं, इथं आपल्यावर अंत्यसंस्कार व्हावे अशी इच्छा असते. या कारणास्तव बरेच लोक त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या काळात काशीला आपलं निवासस्थान बनवतात. इथंच त्यांचा मृत्यू होतो आणि त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार होतात. पण असे 5 लोक ज्यांना काशीत अग्नी दिला जात नाही. जाणून घेऊ, कोण आहेत हे लोक..

काशीमध्ये अशा अनेक स्मशानभूमी आहेत. जिथं चिता 24 तास जळत असतात. इथं चितेची राख थंड होत नाही, अशी स्थिती आहे. पण फार कमी लोकांना माहिती असेल की, काशीच्या भूमीवर पाच लोकांचे मृतदेह कधीही जाळले जात नाहीत. याविषयीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यातील व्यक्तीचे 'या' पाच व्यक्तींचे मृतदेह येथील स्मशानभूमीत आणले, तरी ते परत केले जातात, असे म्हणणे आहे.

हेही वाचा - पुण्यात रिक्षाचालकांची गुंडगिरी! नागरिकांना रोजचा फुकटचा त्रास; पोलीस अद्याप गप्पच

या 5 लोकांना काशीत अग्नी दिला जात नाही

1) या यादीत सर्वांत प्रथम साधूंचा समावेश आहे. येथील स्मशानभूमींमध्ये साधूंचे मृतदेह जाळले जात नाहीत. त्यांच्या मृतदेहाचं जमिनीत दफन केलं जातं किंवा त्या मृतदेहांचं पाण्यात विसर्जन केलं जातं, म्हणजेच, मृतदेह वाहत्या पाण्यात सोडले जातात, असे म्हटले आहे.

2) काशीमध्ये लहान मुलांचे मृतदेहही जाळता येत नाहीत, असे या व्हिडिओतील व्यक्तीने म्हटलं आहे. जर 12 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलाचा मृत्यू झाला, तर त्याचे अंत्यसंस्कार या स्मशानभूमींमध्ये केले जात नाहीत. या मुलांना देवाचं रूप मानलं जातं. या कारणास्तव त्यांना अग्नी देण्यास बंदी आहे.

हेही वाचा - तोलामोलाचं स्थळ हवं! 500 कोटींच्या मार्केट कॅपवाल्या वधूंसाठी मारवाडी-गुजराती वर पाहिजे! लग्नासाठी धमाकेदार जाहिरात

3) येथे स्मशानभूमीत गर्भवती महिलांचेही मृतदेह जाळले जात नसल्याचं या व्हिडिओत सांगितलं आहे. तिसऱ्या क्रमांकावर आहेत. जर त्यांच्या मृतदेहाचे दहन केलं तर, त्यांचं पोट चितेवर फुटेल आणि आतील मूल बाहेर येऊन वरच्या दिशेने उडेल, असे या व्यक्तीने म्हटलं आहे. हे चांगलं वाटणार नाही. या कारणास्तव, गर्भवती महिलांचे मृतदेह देखील जाळले जात नाहीत, असे ते पुढे म्हणाले.

4) साप चावल्याने मृत्युमुखी पडणाऱ्या व्यक्तीचे काशीमध्ये अंत्यसंस्कारही केले जात नाहीत. येथील काही लोकांचं म्हणणं आहे की, साप चावल्याने मृत्युमुखी पडणाऱ्या व्यक्तीचा मेंदू 21 दिवस जिवंत राहतो. अशा परिस्थितीत, त्यांचे मृतदेह केळीच्या खोडाला बांधून ते पाण्यात तरंगवत सोडले जातात. जर एखाद्या तांत्रिकाची नजर या मृतदेहावर पडली, तर तो त्या व्यक्तीला पुन्हा जिवंत करू शकतो, अशी श्रद्धा  यामागे आहे, असे ही व्यक्ती सांगत आहे. यामुळे सर्पदंशाने मृत्यू झालेल्यांचं इथं शरीर जाळलं जात नाही, असे ते म्हणतात.

5) याशिवाय, त्वचेच्या आजाराने किंवा कुष्ठरोगाने ग्रस्त असलेल्या रुग्णाचा मृत्यू झाला तरी, काशीमध्ये त्याचं शरीर जाळलं जात नाही. असं म्हटलं जात आहे की, जर त्याच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले तर, या रोगाचे प्रसारक हवेत पसरतात आणि इतर लोक देखील या आजाराचे बळी ठरू शकतात. या कारणाने या लोकांचे मृतदेहदेखील  काशीमध्ये जाळण्यास बंदी आहे, अशी माहिती व्हिडिओतील व्यक्तीने दिली आहे.

(Disclaimer : ही माहिती धार्मिक श्रद्धेच्या आधारे देण्यात आली आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जय महाराष्ट्र याची हमी देत नाही. कुणाच्याही वैयक्तिक किंवा धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही.)


सम्बन्धित सामग्री