पुणे: गेल्या काही काळात रस्ते अपघात आणि इमारतीतल्या पार्किंगमधील अडचणी वाढत चालल्या आहेत. नुकत्याच पुण्यातील विमान नगर येथील शुभ अपार्टमेंटमध्ये घडलेल्या घटनेनं सगळ्यांना हादरवून सोडलं. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर पार्क केलेली कार अचानक भिंत फोडून खाली कोसळली. सुदैवानं या अपघातात कोणालाही इजा झाली नाही, मात्र या घटनेनं स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलं आहे.
व्हायरल व्हिडीओनं लोकांना विचार करायला लावलं
सोसायटीच्या CCTV कॅमेऱ्यात या घटनेचा व्हिडीओ कैद झाला आहे. या व्हिडीओमध्ये कार दुसऱ्या मजल्यावरून खाली पडतानाचा थरार स्पष्ट दिसतो. कार पडल्यामुळे सोसायटीच्या परिसरात मोठं नुकसान झालं असून, जवळच काम करणारा सुरक्षा कर्मचारी थोडक्यात बचावला.या अपघातानंतर सोसायटीतील लोकांनी तपास केला असता, गाडी चुकीच्या पद्धतीनं पार्क केल्यामुळे हा प्रकार घडल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, अद्याप याचं नेमकं कारण समोर आलं नाही.
त्यामुळे, ही घटना आपल्याला इशारा देत आहे की, सुरक्षित पार्किंग व्यवस्थेचं महत्त्व वाढलं आहे. अशा प्रकारच्या अपघातांपासून बचाव करण्यासाठी सर्वांनी सतर्क राहणं गरजेचं आहे.तुमचं यावर काय मत आहे? ही कार खाली कशी पडली असावी? तुमचा अंदाज जरूर कळवा.