मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी ट्रेन हिच्यामुळेच मुंबईकरांचा दिवस सुरु होतो आणि संपतो सुद्धा. याच लाईफलाईनने लाखो प्रवासी प्रवास करत असतात. तर कधी परराज्यातून आलेली मंडळी ट्रेनच्या प्रवासाला जास्त प्राधान्य देतात कारण त्यांनाही अनुभव घायचा असतो काय आहे मुंबईची लाईफलाईन. पण आता रहायला प्रश्न रोजच्या मंडळींचा ज्यांना ट्रेनची चांगलीच सवय झाली आहे कारण या धकाधकीच्या जीवनात दर दिवशी ट्रेनमध्ये काहीनाकाही नवीन पाहायला मिळतं. त्यामुळे ट्रेनमध्ये होणारी भांडणं आपल्याला काही नवीन नाहीत ट्रेनच्या सीटवर बसण्यासाठीची ते टर्नच्या दरवाजाजवळ उभ राहण्यासाठी केलेली जोरदार भांडण आपण प्रवास करता करता अनुभवत असतो. त्यात महिलांची भांडणं म्हणजे काही साधीसुधी नसतात. अहो जाओ पासून कधी त्या तू तू मैं मैं पर्यंत जाऊन पोचतील याचा काही नेम नाही आणि एवढ्यावर नाही भागलं तर थेट हाणामारी पर्यंत कसं जातील हे महिलानांच माहित.
आपण अनेकदा समाज माध्यमांवर व्हायरल झालेल्या भांडणांच्या अनेक व्हिडिओ पाहत असतो, आता नवीन वर्षाची सुरवात झाली २०२५ सुरु झाला आणि एवढ्या चांगल्या मुहूर्तावर ट्रेनमध्ये कोणतीच भांडणं नाही झाली असं कसं होईल. यावर्षीदेखील ट्रेनमध्ये दोन महिलांमध्ये जोरदार भांडण झालं आणि हे भांडण मारामारीपर्यंत पोहोचलं.
नेमकं काय घडलं ते जाणून घेऊया…
समाज माध्यमावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये दोन महिला अगदी एकमेकींचे केस ओढत जोरजोरात भांडत ट्रेनमध्ये मारामारी करताना दिसत आहेत. आणि ही महिलांची मारामारी पाहायला गर्दी जमलीय, पण कोणीही त्यांची भांडणं सोडवण्यासाठी पुढे आल्याचं दिसत नाही. अखेर टीसी या भांडणाच्या मध्ये पडतो आणि दोन्ही महिलांना वेगळं करतो.