Sunday, February 16, 2025 09:54:11 AM

Udit Narayan Defends His Viral Concert Kiss
उदित नारायण लाइव्ह शोमध्ये हरखले! महिलांना किस केल्यानं सोशल मीडियावर गदारोळ

बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध गायक उदित नारायण यांचे गोड गाणे ऐकून लाखो चाहत्यांची मने आजही प्रसन्न होतात. मात्र, सध्या ते त्यांच्या गाण्यांपेक्षा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहेत.

 उदित नारायण लाइव्ह शोमध्ये हरखले महिलांना किस केल्यानं सोशल मीडियावर गदारोळ

बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध गायक उदित नारायण यांचे गोड गाणे ऐकून लाखो चाहत्यांची मने आजही प्रसन्न होतात. मात्र, सध्या ते त्यांच्या गाण्यांपेक्षा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहेत. एका लाइव्ह शोदरम्यानचा त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, आणि त्यावर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

नेमकं काय घडलं ?
उदित नारायण स्टेजवर परफॉर्म करत असताना एक महिला फॅन त्यांच्या जवळ सेल्फी घेण्यासाठी आली. मात्र, त्यानंतर जे घडलं, त्यानं सर्वांनाच आश्चर्यचकित केलं! त्या महिलेनं गालावर किस केल्यानंतर उदित नारायण यांनी तिलाही लिप किस केल्याचं व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला असून, चाहत्यांमध्ये मोठी चर्चा रंगली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

व्हायरल व्हिडिओनं वाढवल्या चर्चेच्या लाटा
एक नाही, तर या शोमधील अनेक व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यामध्ये उदित नारायण महिलांसोबत हाच प्रकार करताना दिसत आहेत. या प्रकारामुळे नेटकऱ्यांनी त्यांना चांगलेच ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.“यांच्या घटस्फोटाची बातमी लवकरच येऊ शकते,” “आदित्य, तुझ्या वडिलांना सांभाळ” अशा मजेशीर कमेंट्स करत लोक त्यांच्यावर विनोद करत आहेत. काहींनी मात्र, “हे योग्य नाही,” असं म्हणत त्यांच्यावर टीका देखील केली आहे.

हेही वाचा:  'ती काही फार मोठी घटना नव्हती', भाजप खासदार हेमा मालिनींचे महाकुंभातील चेंगराचेंगरीवर वक्तव्य; 30 जणांचा झाला मृत्यू

काय म्हणाले उदित नारायण ? 
"मी आजपर्यंत असं कोणतंही कृत्य केलं नाही, ज्यामुळे मला, माझ्या कुटुंबाला किंवा माझ्या देशाला लाज वाटेल. आयुष्याच्या या टप्प्यावर, जेव्हा मी सर्व काही कमावलंय, तेव्हा मी असं काही का करेन? माझ्या चाहत्यांशी माझं एक अतूट आणि प्रेमळ नातं आहे. तुम्ही व्हिडीओत जे पाहताय, त्यात फक्त त्यांच्या प्रेमाची झलक दिसतेय. ते माझ्यावर प्रेम करतात, म्हणून मी त्यांच्यावर त्याहून अधिक प्रेम करतो."

तसेच, पश्चातापाच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी स्पष्ट सांगितले –
"मला कोणताही पश्चाताप नाही! पश्चाताप असता, तर तो माझ्या आवाजातून जाणवला असता. पण उलट, मी तुम्हाला बोलताना हसत आहे. ही काही लपवण्यासारखी किंवा वाईट गोष्ट नाही, माझं मन पूर्णपणे स्वच्छ आहे. जर लोक माझ्या प्रेमाकडे चुकीच्या नजरेने पाहत असतील, तर त्याचं मला नक्कीच दुःख आहे. पण मी अशा लोकांचे आभार मानेन, कारण त्यांनी मला आधीपेक्षा जास्त लोकप्रिय केलंय!"


सम्बन्धित सामग्री