Sunday, February 16, 2025 10:34:55 AM

Viral video on the ST BUS Driver
एस.टी. बसची अनोखी अवस्था: ड्रायव्हरच्या 'क्लासिक' प्रश्नावर व्हायरल व्हिडीओ

सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे ज्यामध्ये एक एसटी चालक बस मध्ये कसा चढू असा प्रश्न करत आहे?

एसटी बसची अनोखी अवस्था ड्रायव्हरच्या क्लासिक प्रश्नावर व्हायरल व्हिडीओ

मुंबई : राज्यातील एस.टी. बस सेवा आणि त्याची बिकट अवस्था ही विषय कधीच चर्चेचा भाग ठरली आहे. कधी खराब सडके, कधी बसची खराब स्थिती, तर कधी अनवधानाने घडणारे अपघात, हे सर्व काही असताना आता एक वेगळाच व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नक्कीच तुम्हीदेखील चुकून हसाल आणि आश्चर्यचकित होईल.

व्हिडीओमध्ये एक एस.टी. बस आहे, ज्यामध्ये पायऱ्यांची रचना अशी केली आहे की, बसमध्ये चढायचं कसं, हा प्रश्न ड्रायव्हरला पडला आहे! होय, तुम्ही योग्य वाचलं—पायऱ्या खिडकीवर आहेत आणि दरवाजा दुसऱ्या बाजूने उघडतोय. हेच पाहून ड्रायव्हर काकांना प्रश्न पडला, “आता मी या बसमध्ये चढायचं कसं?” त्यांचं हे प्रश्न खरंतर एका गंभीर आणि विनोदी परिस्थितीचं प्रतीक आहे.

हा व्हिडीओ पुणे ट्रेंडिंग  या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आणि त्यामुळे तो त्वरित सोशल मीडियावर पसरण्यास प्रारंभ झाला. ड्रायव्हर ने काही सेकंदातच परिवहन महामंडळाच्या कामकाजावर रोस्ट करत त्यांना एक प्रश्न विचारला: “या बसमध्ये मी चढायचं कसं?” आणि त्याचं उत्तर देणं अत्यंत कठीण आहे, कारण पायऱ्या खिडकीच्या खाली दिल्या आहेत, आणि दरवाजा तो उघडतो जेव्हा ड्रायव्हर बसमध्ये शिरतो, तिथे काहीच पायऱ्या नाहीत!

हे सर्व पाहून या व्हिडीओला १६ लाखांहून अधिक लोकांनी पाहिलं आहे. यावर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. काही लोकं मजाक करत आहेत की, एस.टी. महामंडळ आता 'कोमात' जाईल, तर काहींनी समजावलं की कदाचित आधी पायऱ्या बसवून मग बसच्या दरवाज्याची काच कोरली गेली असावी. काहींनी तर विचारलं की, या पायऱ्यांचा उद्देश खिडकीची काच पुसण्यासाठी असावा!

'>http://

 

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.


सम्बन्धित सामग्री






Live TV