AI तंत्रज्ञानाने जगभरात क्रांती घडवली आहे. ChatGPT सारख्या प्लॅटफॉर्ममुळे ई-मेल, प्रेझेंटेशन, सुट्टीचा अर्ज, अगदी पुस्तकही काही मिनिटांत लिहिता येतं. त्यामुळे कंटेंट तयार करणाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आल्याची चर्चा सुरू होती. कारण तुम्ही विचारलेल्या प्रश्नाची उत्तर असो वा कोणतं काम असो ChatGPT अगदी काही क्षणातच तुम्हाला तोडगा देत होता.पण आता स्वतः ChatGPT वरच संकट आलं आहे!
चॅटजीपीटीला टक्कर देण्यासाठी चीनचं ‘डीपसीक’ मैदानात!
चीनने “Deepseek” नावाचा नवीन AI मॉडेल सादर केला आहे, जो ChatGPT पेक्षाही अधिक अॅडव्हान्स असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे आता AI च्या या स्पर्धेत अमेरिका आणि चीन समोरासमोर आले आहेत. Deepseek च्या एंट्रीमुळे ChatGPT ची लोकप्रियता आणि बाजारातील किंमत घटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा 👉🏻 डोनाल्ड ट्रम्प आयकर रद्द करणार? देश चालवण्यासाठी 'या' देशांवर करणार वसुली!"
सोशल मीडियावर मीम्सचा धुमाकूळ!
AI वॉर सुरू होताच नेटिझन्सनी भन्नाट मीम्स बनवायला सुरुवात केली आहे. काही लोक म्हणत आहेत, “ChatGPT आता रिटायर होणार,” तर काही भारतीय यूजर्स “आता AstroTalk च वापरणार” असं म्हणत आहेत.
AI चं भविष्य कोण जिंकणार?
ChatGPT की Deepseek – यातील कोणता AI प्लॅटफॉर्म टिकणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. पण एक मात्र नक्की, AI स्पर्धा दिवसेंदिवस अधिक रंगतदार होत आहे!
हेही वाचा 👉🏻 बाजारात डिजिटल रुपया! मोबिक्विक आणि क्रेडची नवी क्रांती; सामान्य चलनापेक्षा वेगळा कसा?
नेटकऱ्यांची प्रतिक्रिया
भारतीय युजर्स:

मेटाचं काय होणार?

चीनी प्रोडक्टवर विश्वास ठेवता येईल?

डीपसीक डेटा कुठून मिळवणार?

डीपसीकने केला एनव्हिडीयाचा गेम

चॅटजीपीटीचं करिअर धोक्यात ?

तुम्ही काय वापरणार?

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.