Mon. Jan 17th, 2022

कोहली- रोहितने घेतला ‘या’ आजीबाईंचा आशीर्वाद

भारत आणि बांगलादेशमध्ये झालेल्या सामन्यात भारतीय संघ विजयी ठरली असून World Cup च्या उपांत्य फेरीत स्थान प्राप्त केले आहे. हा सामना बर्मिंगहॅमच्या एजबस्टन येथे रंगला. नेहमी प्रमाणे यंदाही ऑडियन्समध्ये क्रिकेटची मोठी फॅन आजीबाई चर्चेचा मोठा विषय बनली होती. ही आजी 87 वर्षाची असून भारतीय संघाच्या खेळाडूने चौकार किंवा षटकार मारल्यावर पिपाणी वाजवून आनंद व्यक्त करताना दिसत होती.

नेमकं ‘ही’ आजी आहे तरी कोण ?

भारत आणि बांगलादेशमध्ये झालेल्या सामन्यात भारताने बांगलादेशला 24 धावांनी पराभव केला.

भारताने 315 धावा करत बांगलादेशला आव्हान दिले.

भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहलीने चांगली फलंदाजी केली.

मात्र या दोन्ही खेळांडूच्या फलंदाजीची केवळ चर्चा झाली नाही तर ऑडियन्समध्ये क्रिकेटची मोठी फॅन आजीबाई चर्चा झाली.

ही आजी भारतीय संघाच्या फलंदाजांनी चौकार किंवा षटकार मारल्यावर लहान मुलांची पिपाणी वाजवत होती.

यामुळे आजी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली.

87 वर्षांची असून सुद्धा क्रिकेटची मोठी फॅन असल्यामुळे आजीबाईंनी खेळाडूंनाही आकर्षित केले.

चारूलताबेन पटेल असे या आजीबाईंचे नाव आहे.

दोन्ही गालावर भारताचे झेंडे काढलेले आणि हातात पिपाणी घेत असल्याचे दिसत आहे.

कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्माने या आजीबाईंचा आशीर्वाद घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *