विराट कोहली आणि अनुष्का शर्माला कन्यारत्न प्राप्त…
विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या जीवनात नव्या पाहुण्याचं आगमण…

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अनुष्का शर्मा विराट कोहली सतत चर्चेत होते आणि आता पुन्हा एकदा अनुष्का आणि विराट चर्चेत आले आहे. अनुष्काने मुलीला जन्म दिला आहे. स्वतः विराटने त्याच्या ट्विटर अकाउंटवरून ही बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली. आज सकाळीच अनुष्का आणि विराट नेहमीप्रमाणे चेकअपसाठी इस्पितळात गेले होते. त्यानंतर ११ जानेवारी २०२१ रोजी ब्रीच कॅण्डी इस्पितळात अनुष्काने बाळाला जन्म दिला.
— Virat Kohli (@imVkohli) January 11, 2021
अनुष्का आणि विराटच्या मुलीला ‘करोनिएल’ म्हणून संबोधलं जाईल. याचं मुख्य कारण म्हणजे कोरोना काळात जन्माला आलेल्या बाळांना ‘करोनिएल’ या विशेष नावाने संबोधलं जातं आहे. या महामारीच्या काळात जन्मलेल्या बाळांना ‘कोविड- किड’ असंही काही ठिकाणी म्हटलं जातं आहे.
ऑगस्ट २०२० मध्ये अनुष्का आणि विराट यांनी सोशल मीडियावर एकमेकांसोबतचा फोटो शेअर करून संपूर्ण जगाला ही गोड बातमी दिली. शिवाय जानेवारी २०२१ मध्ये बाळ जन्माला येईल असंही त्यांनी सांगितलं होतं. यापुर्वी सुद्धा विराट आणि अनुष्काने काही फोटो ही सोशल मीडियावर शेअर केली होती. त्यानंतर १० जानेवारी रोजी अभिनेत्रीने तिच्या ब्रन्चचा एक फोटो शेअर केला होता. यासोबतच तिने पाणीपुरी खातानाचाही फोटो इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केला होता.