Fri. Jan 28th, 2022

विराट कोहली ठरला ‘या’ बाबतीत सचिन तेंडुलकरपेक्षा सरस!

भारताने दुसऱ्या वनडे सामन्यात वेस्ट इंडिजचा डकवर्थ लुईस नियमानुसार 59 धावांनी पराभव केला. या सामन्यात कॅप्टन विराट कोहलीने 14 चौकार आणि 1 षटकार लगावत आपल्या वन-डे करिअर मधील 42 वं शतक ठोकलं. 41 व्या शतकानंतर 42 वं शतक झळकवताना त्याने सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडलाय.

सचिन तेंडुलकरला 41 व्या शतक झाल्यानंतर पुढचं शतक झळकवण्यासाठी तब्बल 37 सामने खेळावे लागले.

याउलट विराटने मात्र 41 व्या शतकानंतर 42 वं शतक करण्यासाठी विराटला मात्र 11 सामने वाट पाहावी लागली.

या सामन्यात खेळताना भारताने पहिल्यांदा बॅटिंगचा निर्णय घेतला.

टीम इंडियाने 7 विकेट्सच्या बदल्यात 279 धावा काढल्या.

विंडीजच्या बॅटिंगदरम्यान नेमका पाऊस सुरू झाला.

त्यामुळे वेस्ट इंडिजला 46 ओव्हर्समध्ये 270 रन्सचं आव्हान देण्यात आलं.

मात्र हे आव्हानही वेस्ट इंडिजला पूर्ण करणं जमलं नाही आणि विंडिजचा संघ 210 धावांमध्येच तंबूत परतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *