#ICCAwards: विराट ठरला ‘Hat-Trick Hero’ , एकाच वर्षी जिंकले 3 मानाचे पुरस्कार

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने 2018च्या आयसीसी पुरस्कारांमध्ये आपला ऐतिहासिक ठसा उमटवला आहे.

सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूला दिला जाणारा ‘सर गॅरफिल्ड सोबर्स पुरस्कार’, ‘सर्वोत्तम वन-डे क्रिकेटपटू’ आणि ‘सर्वोत्तम कसोटीपटू’ अशा तिन पुरस्कारांवर विराट कोहलीने आपले नाव कोरले आहे.

2018 सालात विराटने वन-डे क्रिकेटमध्ये 133.55 च्या सरासरीने 1 हजार 202 धावा काढल्या आहेत. यामध्ये 6 शतकं आणि 3 अर्धशतकांचाही समावेश आहे.

यासोबतच विराटने 2018 वर्षात अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे.

सचिन तेंडुलकरचा सर्वात जलद 10 हजार धावांचा विक्रमही विराट कोहलीने आपल्या नावे केला आहे. ऑस्ट्रेलियाच्या भूमीत कसोटी आणि वन-डे मालिकेमध्ये भारताला विजय मिळवून देण्यातही विराट कोहली यशस्वी ठरला आहे.

आयसीसीच्या कसोटी आणि वन-डे संघाचे कर्णधारपदही विराट कोहलीने मिळवले असून 2019 हे वर्ष विराटसाठी खऱ्या अर्थाने ‘Happy Year’ ठरले आहे.

Exit mobile version