Sun. Jun 20th, 2021

विराट कोहलीची शतकी खेळी! मोडला सचिनचा विक्रम

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने जबरदस्त खेळी करत शतक झळकावले आहे. प्रथम उपकर्णधार अजिंक्य रहाणेबरोबर आणि त्यानंतर नवोदित हनुमा विहारीबरोबर भागीदारी करत कोहलीने ही धडाकेबाज कामगिरी केली आहे. हे कोहलीचे कसोटी कारकिर्दीतील 25 वे शतक ठरले. या शतकी खेळीत त्याने 11 चौकार लगावले आहेत.

या खेळीबरोबरच विराटने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला आहे. कोहलीने आपली 25 शतके पूर्ण करण्यासाठी 127 डाव खेळले आहेत. हा मैलाचा दगड गाठण्यासाठी सचिनला मात्र 130 डाव खेळावे लागले होते. दरम्यान या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव सर्वबाद 326 वर आटोपला आहे. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर फिंच हॅरिस आणि हेड यांनी केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ही मजल मारली आहे.

इशांत शर्माने सर्वाधिक 4 बळी टिपत यजमानांचा डाव गुंडाळण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यास प्रत्युत्तर म्हणून दुसऱ्या दिवसअखेरपर्यंत भारताने 3 बाद 172 धावा केल्या. कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे या दोघांनी केलेल्या नाबाद भागीदारीच्या जोरावर भारताला या धावसंख्येपर्यंत मजल मारता आली. आज दिवसाचा खेळ सुरु झाला त्यावेळी रहाणे बाद झाला. पण विराटने विहारीच्या साथीने आपली झुंज सुरु ठेवली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *