Tue. Dec 7th, 2021

आयसीसीच्या टेस्ट रॅंकिंगमध्ये ‘विराट’ अव्वल

दुबई : टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीने आयसीसीच्या टेस्ट रॅंकिंगमध्ये पुन्हा पहिला क्रमांक पटकावला आहे. आयसीसीने जारी केलेल्या टेस्टच्या ताज्या आकडेवारीनुसार विराट कोहली पहिल्या क्रमांकावर पोहचला आहे.

ऑस्ट्रेलियाच्या स्टीव स्मिथला पछाडत विराटने ही कामगिरी केली आहे. विराट 928 पॉइंट्ससह पहिल्या क्रमांकावर आहे. तर स्टीव स्मिथ 923 पॉईंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे. चेतेश्वर पुजारा 791 पॉईंट्ससह चौथ्या तर अजिंक्य रहाणे 759 पॉइंट्ससह सहाव्या क्रमांकावर आहे.

आयसीसीच्या टेस्ट बॉलर्सच्या टॉप-10 यादीत टीम इंडियाच्या 3 जणांचा समावेश आहे. यात पाचव्या क्रमांकावर जस्प्रीत बुमराह, नवव्या क्रमांकावर रविचंद्रन आश्विन तर दहाव्या क्रमांकावर मोहम्मद शमी आहे.

ऑलराऊंडर्सच्या टॉप-10 यादीत टीम इंडियाचे 2 खेळाडू आहेत. यात रविंद्र जडेजा 406 पॉइंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर 308 पॉइंट्ससोबत रविचंद्र आश्विन पाचव्या क्रमांकावर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *