Sun. Jun 20th, 2021

तुला मानलं रे ठाकूर ! विराट कोहलीचं शार्दुल ठाकूरसाठी मराठीत ट्विट

विराट कोहलीने शार्दूल ठाकूरसाठी मराठीत ट्विट केलं आहे. शार्दूल ठाकूरने रविवारी विंडिज विरुद्धच्या अंतिम सामन्यात निर्णायक खेळी केली.

याखेळीचे कौतुक करण्यासाठी विराटने शार्दूलसाठी मराठीत ट्विट केले आहे. तसेच शार्दूल सोबतचा एक फोटोदेखील शेअर केला आहे.

काय म्हणाला विराट ?

तुला मानलं रे ठाकूर, असं म्हणतं विराटने शार्दूलचे कौतुक केले आहे.

टीम इंडियाला विजयासाठी विंडिजने 316 धावांचे आव्हान दिले होते. विजयासाठी टीम इंडियाला 30 धावांची गरज असताना विराट कोहली आऊट झाला. कोहली बाद झाल्यानंतर मैदानात शार्दूल ठाकूर आला.

शार्दुल ठाकूरने 6 बॉलमध्ये निर्णायक 17 धावांची खेळी केली. या खेळीत शार्दूलने 1 सिक्स आणि 2 फोर लगावले.

यानंतर रविंद्र जडेजाच्या सोबतीने या दोघांनी टीम इंडियाला विजयापर्यंत पोहचवले. शार्दूलने बॉलिंग करताना 1 विकेट घेतला. त्याने 89 निकोलस पूरनला आऊट केले होते.

टीम इंडियाने रविवारी विंडिजवर अंतिम सामन्यात विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने 2-1 च्या फरकाने मालिका जिंकली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *