Mon. Jan 17th, 2022

विराट कोहली ‘इथून’ करणार मतदान

लोकसभा निवडणुका सुरू असून  राजकीय नेत्यांनी नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. नागिरकांपासून ते दिग्गज मंडळींपर्यंत मतदान करण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र काही दिवसांपासून भारतीय संघाचा क्रिकेटपटू  विराट कोहली  मतदान करू शकणार नाही असे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र स्वत: विराट कोहलीने  Instagramवर मतदान करणार असून त्याने आपल्या  Voter ID चे फोटो शेअर केले आहे.

नेमकं प्रकरण काय ?

गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली मतदान करू शकत नाही असे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.

काही दिवसांपूर्वीच विराट कोहली आपली पत्नी अनुष्का शर्मासोबत मुंबई राहण्यासाठी आला आहे.

वरळी येथे त्यांनी आपले नवीन घर घेतले असून ते राहण्यासाठी मुंबईत आले आहे.

त्यामुळे मुंबईत मतदान करण्यासाठी विराट कोहलीने आपला पत्ता बदलण्याची प्रक्रिया केली.

मात्र ही प्रक्रिया करण्याची शेवटची तारीख ३० मार्च असल्यामुळे ते पूर्ण झालेच नाही.

त्यामुळे विराट मतदान करू शकत नाही तसेच पुढच्या निवडणुकीतच मतदान करू शकणार असे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

मुंबईतून मतदान करू शकत नसल्याने विराट कोहली नाराज झाला होता.

मात्र विराट कोहली आता गुरूग्राम येथून मतदान करणार असल्याचे त्याने म्हटलं आहे.

Instagram वर Elector Photo Identity Card चा फोटो शेअर केला आहे.

‘मी गुरुग्राममधून १२ मे रोजी मतदान करणार असून तुम्ही करणार ना ? ‘,अशी पोस्ट शेअर केली आहे.

त्यामुळे विराटच्या चाहत्यांना तो मतदान करणार असल्यामुळे आनंद झाला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *