Thu. Jan 21st, 2021

विराट कोहलीचा जुना व्हिडीओ व्हायरल

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई  

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली लाखो तरुणींच्या हृदयाची धडकन आहे. खेळच नाही तर मॅजिकल चार्ममुळे त्याचा फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. प्रत्येकाला विराटच्या पर्सनल लाईफबाबत जाणून घेण्याची उत्सुकता असते. पण विराट कोहली त्याच्या खासगी आयुष्याबद्दल बोलणं टाळतोच.

क्रिकेट चाहत्यांना त्यांच्या आवडत्या स्टार्सचे व्हिडीओ पाहायला आवडतात. आता तर विराटच्या चाहत्यांसाठी जणू काही ट्रीटच आहे. कारण विराट कोहलीचा एक जुना व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे.

प्रसिद्ध व्हीजे अनुषा दांडेकरने विराटची मुलाखत घेतली असून तिने यात काही मजेशीर प्रश्न विचारले आहेत. तुम्हालाही हा व्हिडीओ पाहायला नक्कीच आवडेल. या व्हिडीओमध्ये विराट फारच वेगळा दिसत आहे. तसंच अनुषाच्या प्रश्नाची हटके उत्तरं त्याने दिली आहेत.

 

 

 

या व्हिडीओत विराटने अनेक गुपितं उलगडली आहेत. ही सिक्रेट्स तुम्हाला नक्कीच आवडतील. सर्वात छोटी ब्लाईंड डेट किती मिनिटाची होती, आवडती बॉलिवूड अभिनेत्री कोण याची विराटने दिलेली उत्तरं अतिशय रंजक आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *