Sat. Oct 1st, 2022

टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी वीरुचा अवघ्या दोन ओळींचा बायोडेटा

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

टीम इंडियाचा दिग्गज सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवागसह अन्य सात जणांनी भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज केले आहेत.

 

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेनंतर अनिल कुंबळे यांचा कार्यकाळ संपत असून हे स्थान रिक्त होणार आहे.  कुंबळे यांना प्रक्रियेमध्ये थेट सहभागी होता येईल तर अन्य दावेदारांमध्ये ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक टॉम मुडी व इंग्लंडचे रिचर्ड पायबस यांचा समावेश आहे.

 

भारताचे माजी वेगवान गोलंदाज डोडा गणेश व भारत ‘अ’ संघाचे माजी प्रशिक्षक लालचंद राजपूत यांनी देखील या पदासाठी अर्ज केले आहेत.

 

प्रशिक्षकपदासाठी विरेंद्र सेहवागने बीसीसीआयला जो बायोडेटा पाठवला तो अवघ्या दोन ओळींचा असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बोर्डाने सेहवागकडून संपूर्ण बायोडेटा मागितला आहे.

 

सेहवागने आपल्या बायोडेटामध्ये आयपीएलमधील किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा मेंटर आणि प्रशिक्षक असल्याचे सांगितले आहे.

 

तसेच सध्याच्या संघातील ज्या खेळांडूसोबत खेळला त्यांची नावे त्याने टाकली आहेत. माध्यमांच्या वृत्तानुसार सध्या आलेल्या सर्व अर्जांची पडताळणी सुरु आहे.

 

बोर्डाने सेहवागकडून सविस्तर बायोडेटा मागवला आहे. त्यानंतर सेहवागला मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल.

 

क्रिकेट सल्लागार समिती प्रशिक्षकपदाचा अंतिम निर्णय घेणार आहेत. या समितीमध्ये सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.