Mon. Jan 24th, 2022

विराट अनुष्काने सुरू केलं होतं कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी अभियान

देशात कोरोनामुळे परिस्थिती ही फार गंभीर झाली आहे. देशात कोरोना आटोक्यात आणण्यासाठी अनेक प्रयत्न केल्या गेले आहे. शिवाय देशात दुसऱ्या लाटेने थैमान घातलं आहे. सगळीकडेच चिंतेचं वातावरण आहे. रुग्णांना बेड आणि ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. कोरोना विरुद्ध लढ्यासाठी अनेक देशांनी भारताची मदत केली शिवाय अनेक उद्योगपती आणि सेलिब्रिटींनी मदत केली आहे. आता यात आणखी एका जुडलं आहे ते म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यांनीही कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी एक पाऊल पुढे टाकलं आहे. किटो या संस्थेच्या मदतीने विराट आणि अनुष्काने एक अभियान सुरू केलं होतं. त्यांच्या या अभियानाअंतर्गत त्यांनी जवळपास ३ कोटी ६० लाख रुपये जमा केले आहे.

अनुष्का आणि विराटने किटो या संस्थेमार्फत नागरिकांना कोरोनाग्रस्तांसाठी शक्य तितकी मदत करण्याचं आवाहन केलं होतं. हे पैसे कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी वापरले जाणार आहेत. विराट आणि अनुष्का यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत देशातील कित्येक नागरिकांनी किटोमध्ये देणगी दिली तर २४ तासात विराट- अनुष्काने ३ कोटी ६० लाख रुपये जमा केले असून विराटने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर फोटो शेअर करत लिहिलं, ‘२४ तासांपेक्षाही कमी वेळात ३ कोटी ६० लाख रुपये. तुमच्या प्रतिसादाबद्दल मी खूप आनंदी आहे. आमचं लक्ष्य पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत राहा आणि देशाची मदत करत राहा. धन्यवाद.’ अनुष्कानेही तिच्या इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत सगळ्यांचे आभार मानले आणि लिहिलं, ‘मी तुम्हा सगळ्यांची आभारी आहे ज्यांनी आतापर्यंत मदत केली आहे. तुमच्या मदतीसाठी धन्यवाद. आपण अर्धा रस्ता पार केला आहे. पुढे चालत राहूया.’ विराट आणि अनुष्काने या अभियानात २ कोटींची मदत देणार असल्याची घोषणा केली आहे. विराट आणि अनुष्काचं हे अभियान जवळपास सात दिवस सुरू राहणार आहे. शिवाय या जमा झालेल्या पैशातून कोरोनाग्रस्तांसाठी ऑक्सिजन, लसीकरण आणि इतरही काही सुविधा पुरवल्या जाणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *