मंत्र्यांमुळे भाविकांना विठूरायाच्या दर्शनासाठी रांगेत ताटकळत उभे रहावे लागू नये म्हणून विशेष उपाययोजना
जय महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर
पंढरपूरची आषाढी वारी यावर्षी विक्रमी म्हणजे जवळपास पंधरा लाखांच्या आसपास भरण्याचा अंदाज जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी व्यक्त केला.
आषाढी वारीसाठी ठिकठिकाणावरून संताच्या पालख्या पंढरीच्या दिशेने वाट चालू लागल्या आहेत. पालखीसोबत वारकऱ्यांची गर्दी दिसून येत असून एक लाखापेक्षा अधिक
भाविक पदस्पर्श दर्शन रांगेत उभे आहेत.
एका मिनिटात 40 भाविक दर्शन घेत आहेत. दिवसभरात 50 हजार भाविकांनाच पदस्पर्श दर्शन मिळत आहे. हा दर्शनाचा वेगही वाढवण्याचा मंदिर समितीचा प्रयत्न
आहे.
तसेच अनेक मंत्री, खासदार, आमदार दर्शन घेण्यासाठी येतात..त्यामुळे भाविकांना रांगेत ताटकळत उभे राहावे लागते.
भाविकांचा विचार करत याकाळात दर्शन टाळावे असा विचार करत असल्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी सांगितले.