Mon. Jan 17th, 2022

नवरात्रीनिमीत्त पंढरपुरच्या रुक्मिणी मातेला गुजराती लमाणी पोशाख

शक्तीरूपातील देवीचे पूजन आणि सृजनाचा सोहळा असलेल्या नवरात्रोत्सवास रविवारपासून प्रारंभ झाला आहे. घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये घटस्थापना करून नवरात्रोत्सवाच्या मंगल सोहळ्यास प्रारंभ झाला आहे.

शक्तीरूपातील देवीचे पूजन आणि सृजनाचा सोहळा असलेल्या नवरात्रोत्सवास रविवारपासून प्रारंभ झाला आहे. घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये घटस्थापना करून नवरात्रोत्सवाच्या मंगल सोहळ्यास प्रारंभ झाला आहे. दरवर्षीप्रमाणेच यावर्षीही नवरात्रोत्सवासाठी सार्वजनिक मंडळांनी विशेष तयारी केली आहे. अनेक सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांकडून देवीची स्वतंत्र गाणी तयार करण्यात आली आहेत. मुंबईतही जय्यत तयारी सुरू असून जागोजागी गरबा आणि दांडिया जोरदार सुरुवात झाली आहे.

नवरात्रीनिमीत्त रुक्मिणी

रविवार पासून राज्यभरात नऊ दिवसांच्या नवरात्रोत्सवाला सुरुवात झालेली आहे. साडेतीन शक्ती पीठांपैकी एक असलेल्या कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिरात दरवर्षी नवरात्रोत्सव साजरा करण्यात येतो. त्याचप्रमाणे पंढरपुरातही रक्मिणी मातेच्या मंदिरात उत्सव साजरा करण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे.

नवरात्रोत्सवाच्या दरम्यान पहिल्या माळेपासून ते विजयादशमी पर्यंत विठ्ठल आणि रुक्मिणीला हिरेजडित अशा सुवर्णालंकारानी सजवले जाते. नवरात्रीच्या दुसऱ्या माळेला रुक्मिणीमातेला विशिष्ट गुजराती पद्धतीचा लामाणी पोशाख करण्यात आला असून झेला, कर्णफुले, मोत्याची नथ, गुजराती पद्धतीने सोन्याचू तानवडे व विविध प्रकारच्या हिरे आणि मोत्यानी तयार केलेल्या माळाचा समावेश असतो.

पांडुरंगाला निळा अंगरखा परीधान केलेला असून आवातारातील कोस्तुभ मणी व सुवर्ण अलंकार, मोरपीस हे सर्व ऐतिहासिक अंलकार परिधान करण्यात आले आहे. अलंकाराने सजलेली रुक्मिणी आणि विठ्ठलाचे रुप पाहण्यासाठी अनेक भाविक दर्शनासाठी गर्दी करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *