Sun. Jun 20th, 2021

 विठ्ठल मंदिराला 11 हजार आंब्यांची आरास

नुकताच अक्षय्य तृतीयेनिमित्त विठुरायाला झेंडूंच्या फुलांची आकर्षक सजावट, दगडूशेठ गणपतीला 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखवण्यात आला. नेहमी आपण विठुरायच मंदिर विविध रंगबिरंगी फुलांनी पानांनी सजलेलं असतो.  मात्र आज विठ्ठल मंदिराला आमराईच रूप आलय तब्बल  11 हजार रत्नागिरी हापूस आंब्यांची सजावट विठ्ठल मंदिराला करण्यात आली आहे.यामध्ये देवाचा गाभारा ,चौखांभी,सोळखांभीला आंब्यांची आरास करण्यात आली आहे. संपूर्ण मंदिर परिसर आंब्याच्या सुवासाने दरवाळून निघाला आहे .

विठुरायावर प्रथमच आंब्यांची आरास

पंढरपुरातील विठ्ठल मंदीर हे लाखो भाविकांची श्रद्धास्थान आहे.
यामुळे प्रत्येक सणाला हे मंदीर फुलांनी सजवलं जात.
यावेळी  विठुरायाच्या आणि श्री रुक्मिणी मातेच्या गाभार्‍यात हापूस आंब्यांची आरास करण्यात आली होती.

गेल्या वर्षभरात विविध सण आणि उत्सवाच्या निमित्ताने आकर्षक आणि रंगीबेरंगी फुलांनी विठ्ठल आणि रुक्मिणीच्या गाभाऱ्यात सजावट करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

सध्या आंब्याचा सीझन सुरु असल्याने आज तब्बल अकरा हजार हापूस आंब्याचा वापर करून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा गाभारा आकर्षक पद्धतीने सजवला आहे.

पुण्यातील  आंब्याचे व्यापारी विलास काची यांनी ही आरास केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *