Sat. Jul 31st, 2021

ऐश्वर्याचे फोटो वापरत विवेक ओबेरॉयचे एक्झिट पोलवर टविट्

अभिनेता विवेक ओबेरॉय यांनी आज ऐश्वर्याचा फोटो वापरून टविट् केलेला फोटो चांगलाच चर्चेत आला आहे. रविवारी लोकसभा निवडणूकीसंदर्भातील सर्व वाहिन्यांचे एक्झिट पोल जाहीर झाले, यावर सर्वांनी सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. विवेक ओबेरॉय याने ऐश्वर्याचा फोटो शेअर केला आहे आणि हा फोटो निवडणूकीतील एक्झिट पोलवर आहे. या फोटोत ऐश्वर्या राय सोबत विवेक ओबेरॉय, सलमान खान आणि अभिषेक बच्चनही आहेत. ऐश्वर्या राय सोबत सलमान खानच्या फोटोला ओपिनियन पोल नाव दिले आहे, ऐश्वर्या राय सोबत विवेक ओबेरॉय असलेल्या फोटोला एक्झिट पोल असं नाव दिलं आहे. ऐश्वर्या राय सोबत अभिषेक बच्चन व आराध्याच्या फोटोला रिझल्ट नाव दिले आहे. या फोटोची जोरदार चर्चा होत आहे.

विवेक ओबेरॉयचे टविट् चर्चेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आधारित पीएम नरेंद्र मोदी चित्रपट येत आहे.

या सिनेमात पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका विवेक ओबेरॉय साकारतो आहे.

विवेक ओबेरॉय हा भाजपाचा समर्थक सुद्धा आहे. त्याने एक्झिट पोलवर विचित्र टविट् केले आहे.

ऐश्वर्या राय सोबत विवेक ओबेरॉय, सलमान खान आणि अभिषेक बच्चनचा फोटो त्याने शेअर केला आहे.

 


ऐश्वर्या राय पहिल्या फोटोत सलमान खान सोबत आहे आणि त्याला ओपिनियन पोल असे नाव दिले आहे.

दुसऱ्या फोटोत ऐश्वर्या राय विवेक ओबेरॉय सोबत आहे त्याला एक्झिट पोल असं म्हणलं आहे.

ऐश्वर्या राय सोबत अभिषेक बच्चन व आराध्याच्या फोटोला रिझल्ट नाव दिले आहे.

या फोटोमुळे तो चांगलाच चर्चेत आला आहे.

 गुन्हा दाखल करण्याची नवाब मलिक यांची मागणी

विवेक ओबेरॉयवर तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक यांनी केली आहे.

फिल्म अभिनेता विवेक ओबेरॉय हे भाजपला समर्थन देवून महिलाबाबत मर्यादा सोडून अपशब्द बोलत आहेत.

एका पद्मश्री मिळालेल्या महिलेचा अभिनेता विवेक ओबेरॉय एक्झिट पोलच्या नावाखाली अपमान करत आहेत.

कुठे झोपलाय महिला आयोग असा संतप्त सवाल नवाब मलिक यांनी केला आहे.

केंद्र आणि राज्य सरकार कारवाई का करत नाही.सरकारने त्याच्यावर कारवाई केली नाही तर जनतेमधून उद्रेक होईल.

त्यामुळे सरकारने तात्काळ लक्ष घालावा अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *