‘या’ चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान विवेकला दुखापत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट येत आहे. या चित्रपटात नरेंद्र मोदीचे व्यक्तिगत जीवन ते त्यांचा राजकीय प्रवास दर्शविला जाणार आहे.या चित्रपटात नरेंद्र मोदी यांची भूमिका अभिनेता विवेक ओबेरॉय साकारत आहेत. या चित्रपटाचे चित्रिकरण हर्षिल आणि धराली या ठिकाणी चालू आहे. चित्रीकरणादरम्यान विवेकच्या पायाला दुखापत झाली होती. त्यावर उपचार घेऊन पुन्हा चित्रिकरणाला सुरवात झाली आहे.ओमंग कुमार हे चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.
नेमकं काय घडलं ?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट येत आहे.या चित्रपटात विवेक ओबेरॉय मुख्य भूमिकेत आहेत.
‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटात नरेंद्र मोदीचे व्यक्तिगत जीवन ते त्यांचा राजकीय प्रवास दर्शविला जाणार आहे.चित्रपटाचे चित्रिकरण सध्या हर्षिल घाटीमध्ये सुरू आहे.
जम्मू-काश्मीरमधील लाल चौकाचे कृत्रिम दृश्य बनवून शूटिंग सुरू होती.चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान विवेकच्या पायाला दुखापत झाली.
विवेकच्या पायाला दुखापत झाल्यामुळे काही काळपर्यंत शूटिंग थांबले होते.मात्र त्यावर उपचार घेऊन विवेक सेटवर परतला,थोड्या वेळानंतर शूटिंग सुरू झाले.
‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट तब्बल 23 भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.ओमंग कुमार हे चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.
ओमंग कुमार यांनी या अगोदर मेरी कॉम आणि सरबजीत हे बायोपीक केले आहेत.
या चित्रपटात विवेक ओबेरॉयसह बोमन इरानी, जर्ना वाहाब, प्रशांत नारायणन, बर्खा बिस्ट सेनगुप्ता, अक्षत आर सलूजा, अजनन श्रीवास्तव, राजेंद्र गुप्ता हे पक्ष कार्यकर्त्यांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.