‘मोदी’ सिनेमासाठी विवेक ओबेरॉय साईचरणी!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारित ‘PM नरेंद्र मोदी’ या सिनेमाच्या प्रदर्शनात अनेक अडथळे येत आहेत. निवडणूक काळात हा सिनेमा रिलीज होणार की नाही, याबद्दल अजूनही प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळेच हा सिनेमा लवकर प्रदर्शित व्हावा, अशी प्रार्थना करण्यासाठी या सिनेमातील मुख्य कलाकार विवेक ओबेरॉय आणि दिग्दर्शक ओमंग कुमार शिर्डीला दाखल झाले.

“चित्रपटाचा ट्रेलर पाहून भ्रमित झाले आहेत”

अभिनेता विवेक ओबेरॉय आणि दिग्दर्शक ओमंग कुमार यांनी साईचरणी प्रार्थना केली.

या सिनेमाच्या प्रदर्शनावर विरोधकांनी आक्षेप घेतलाय.

मात्र या चित्रपटावर आक्षेप घेणाऱ्यांनी अगोदर चित्रपट पहावा. तसंच याचिकाकर्ते आणि राहुल गांधी यांनीही हा सिनेमा पहावा. अशी इच्छा अभिनेता विवेक ओबेरॉय याने व्यक्त केली.

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री आणि काँग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी ‘PM नरेंद्र मोदी’ हा सिनेमा म्हणजे कॉमेडी सिनेमा असल्याची टीका केली होती.

याबद्दल बोलताना विवेक ओबेरॉय याने म्हटलं, की  उर्मिला मातोंडकर, विशाल भारद्वाज हे माझे चांगले मित्र आहेत. सिनेमाचं ट्रेलर पाहून ते भ्रमित झाले आहेत. मात्र त्यांनी सिनेमा पाहिल्यास त्यांचं मत नक्की बदलेल.

चहा विकणारा देशाचा पंतप्रधान होतो, ही एक प्रेरणादायी कहाणी आहे. हेच सिनेमातून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आलाय, असं विवेक ओबेरॉय यानी म्हटलंय.

मोदी चित्रपटासंदर्भात सोमवारी 22 एप्रिल रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.

 

Exit mobile version