Fri. Jul 30th, 2021

‘त्या’ Meme मधील लोकांची तक्रार नाही, तर इतरांना कसला त्रास?- विवेक ओबेरॉय

Exit Poll नंतर अभिनेता विवेक ओबेरॉय याने शेअर केलेलं meme वादग्रस्त ठरलं आहे. ऐश्वर्या रायशी संबंध जोडून तयार केलेल्या या meme वर सिनेवर्तुळातील अनेकांनी टीका केली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसनेही या meme वर आक्षेप नोंदवलाय. महिला आयोगाकडूनही विवेक ओबेरॉयला नोटीस पाठवण्यात आली. त्याच्यावर कायदेशीर कारवाई होण्याचीही शक्यता आहे. मात्र यानंतरही विवेक ओबेरॉयने माफी मागण्यास नकार दिला आहे.

अभिनेता विवेक ओबेरॉय यांची प्रतिक्रिया?

या meme मध्ये असलेल्या लोकांची काहीही तक्रार नाही, मात्र इतर लोकांना याबद्दल त्रास आहे.

याबद्दल लोकांनी आक्षेप घेण्यासारखं काय आहे?

मला कोणीतरी हे meme पाठवलं, मी त्याच्या creativity ला दाद दिली, इतकंच.

कामाला न जाणारे लोक अशा गोष्टींवर नेतागिरी करत आहे.

जे लोक माझा सिनेमा बंद करु शकले नाही, ते लोक माझ्याविरोधात काम करत आहेत.

जर कोणी उपहास केला असेल तर अशा गोष्टीला गंभीर घेऊ नये.

 

ऐश्वर्याचे फोटो वापरत विवेक ओबेरॉयचे एक्झिट पोलवर टविट्

 

काय आहे या meme मध्ये?

या meme मध्ये ऐश्वर्या रायचा सलमान खान, विवेक ओबेरॉय आणि आभिषेक बच्चनसोबतचे फोटो असून त्यावर ओपिनिअन पोल, एक्झिट पोल आणि रिझल्ट असं लिहिलं आहे. ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित असणाऱ्या ऐश्वर्या राय बच्चन हिच्या भूतकाळातील वादग्रस्त संबंधांवर यातून निशाणा साधत तिचा अपमान केल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली. मात्र विवेक ओबेरॉयने या टिकेवर माफी मागण्यास सपशेल नकार दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *