Tue. Mar 2nd, 2021

vivo s1 pro स्मार्टफोन लॉंच, पाहा स्पेसिफिकेशन्स

नवा स्मार्टफोन घेण्याच्या शोधात असणाऱ्यांसाठी विवोने नवा स्मार्टफोन आणला आहे.

विवोने भारतात आज vivo s1 pro हा स्मार्टफोन लॉंच केला आहे.

या स्मार्टफोनचा रॅम तब्बल ८ जीबी इतका आहे. तर स्टोअरेज १२८ जीबी इतके आहे.

विवो एस १ प्रो स्मार्टफोनची किंमत १९ हजार ९९० रुपये इतकी असणार आहे. हा स्मार्टफोन आजपासूनच उपलब्ध झाला आहे.

हा स्मार्टफोन ऑनलाईल आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने खरेदी करता येणार आहे.

अनेक इ कॉमर्स वेबसाईट्सवर हा स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. तसेच ग्राहकांना मोबाईल स्टोअरमधून देखील घेता येणार आहे.

हा स्मार्टफोन एकूण ३ रंगांमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. ड्रीमी व्हाईट, मिस्टिक ब्लॅक आणि जॅजी ब्लू या ३ रंगांमध्ये हा स्मार्टफोन असणार आहे.

या स्मार्टफोनचा प्रायमरी कॅमेरा ४८ मेगापिक्सलचा आहे. सेकंडरी कॅमेरा ८ मेगा पिक्सलचा असणार आहे.

तसेच २ मेगापिक्सेलचे २ कॅमेरा असणार आहे. यात एक डेप्थ आणि मॅक्रो कॅमेरा आहे. तसेच ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असणार आहे.

या स्मार्टफोनचा डिस्पले ६. ३८ एचडी तसेच सुपर AMOLED डिस्पले आहे. स्मार्टफोनला डिस्प्लेमध्ये फिंगरप्रिंट सेंसरही आहे.

या स्मार्टफोनमध्ये ड्युअस सिम असणार आहे. तर बॅटरी ४ हजार ५०० एमएच इतकी आहे.

या स्मार्टफोनचे पेमेंट आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडीट द्वारे केल्यास १० टक्के पेमेंट मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *