Sun. Jun 20th, 2021

अभिनय प्रभासचा पण आवाज ‘या’ मराठी अभिनेत्याचा

व्हीएफएक्स, कथाकथनाची शैली आणि कलाकारांचा दमदार अभिनय या जोरावर एस. एस. राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली – द बिगनिंग’ आणि ‘बाहुबली – द कन्क्लुजन’ हे दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफीसवर प्रचंड गाजले. हिंदी ,तेलुगू, इंग्रजी अशा विविध भाषांमध्ये हा सिनेमा पाहिला गेला. पण हिंदी भाषेतील ‘बाहुबली’मध्ये प्रभासला कोणी आवाज दिला हे तुम्हाला माहीत आहे का?

‘बाहुबली – द बिगनिंग’ आणि ‘बाहुबली – द कन्क्लुजन’ या दोन्ही हिंदी सिनेमांसाठी मराठी अभिनेता शरद केळकर याने प्रभाससाठी आवाज दिला. मात्र तुम्ही विचार करत आसाल याची चर्चा आता का होत आहे? यामागचं कारण म्हणजे प्रभास आणि शरदची पहिली भेट. नुकताच प्रभास काही कामानिमित्त मुंबईला आला होता आणि मुंबईत त्याने अभिनेता शरद केळकरची भेट घेतली. शरद केळकरने प्रभाससोबतचा सेल्फी सोशल मीडियावर शेअर केला. शरदने या फोटोला ‘चेहरा आणि आवाज..एकाच फ्रेममध्ये’ असे कॅप्शन दिले आहे.

‘बाहुबली’च्या दोन्ही भागांनी बॉक्स ऑफीसवर नवा विक्रम रचला. ‘बाहुबली : द कन्क्लुजन’ या चित्रपटाने जगभरात 500 कोटींहून अधिक कमाई केली होती.

Sharad Kelkar

@SharadK7

The face and the voice … finally in one frame 🤗.. im honoured 🙏🏼 thankyou @BaahubaliMovie @ssrajamouli @karanjohar

695 people are talking about this

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *