Wed. Aug 10th, 2022

तुमची मुलं ‘चौकीदार’ व्हावीत असे वाटत असेल तर मोदींना मतदान करा – अरविंद केजरीवाल

आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरुवात केलेल्या भाजपाच्या ‘मै भी चौकीदार’ मोहिमेवर जोरदार टीका केली आहे.

जर तुम्हाला तुमची मुलं चौकीदार व्हावीत असे वाटत असेल तर पंतप्रधान नरेंद मोदींना मतदान करा असा टोला अरविंद केजरीवाल यांनी लगावला आहे.

‘नरेंद्र मोदींची संपूर्ण देश चौकीदार व्हावा अशी इच्छा आहे.

जर तुम्हालाही तुमची मुलं चौकीदार व्हावीत असे वाटत असेल तर मोदींना मतदान करा.

पण जर तुम्हाला तुमच्या मुलांना चांगलं शिक्षण द्यायचं असेल आणि त्यांनी डॉक्टर, इंजिनिअर, वकील व्हावं असे वाटत असेल तर आम आदमी पक्षाच्या प्रामाणिक आणि शिक्षित उमेदवारांना मतदान करा’.

असे आवाहन अरविंद केजरीवाल यांनी केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक सभांमध्ये चौकीदार म्हणून स्वत:चा उल्लेख केला होता.

सोशल मीडियावर त्यांनी मोहिमदेखील सुरु केली आहे.

नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर नावाआधी ‘चौकीदार’ असे लिहित नवी मोहिम सुरु केली.

यानंतर काही तासातच भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यासहित केंद्रीय आणि राज्यमंत्र्यांनीदेखील नावापुढे चौकीदार लिहिले.

यानंतर नरेंद्र मोदींनीही सर्व नेत्यांना शुभेच्छा दिल्या होत्या.

भाजपाच्या या मोहिमेवर ‘चौकीदार चोर है’ अशी टीका काँग्रेसने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.