Fri. Jul 30th, 2021

वेगळ्या पक्षाला दिलं vote, मतदाराने कापलं स्वतःचंच बोट!

निवडणुकीत वारंवार चर्चेत येणारा मुद्दा म्हणजे EVM मशीनचा.  EVM मशीनमध्ये आपल्याला हव्या असलेल्या उमेदवाराच्या निशाणीसमोरील बटण दाबूनही मत वेगळ्याच पक्षाला जातं, असा आरोप सध्या होत आहे. मात्र जर मतदारानेच चुकून वेगळं बटण दाबून भलत्याच उमेदवाराला vote दिलं तर?

उत्तर प्रदेशात एका मतदाराने आपल्या पार्टीला vote देण्याऐवजी चुकीचं बटण दाबून वेगळ्याच पक्षाला vote दिलं. मात्र आपली चूक लक्षात आल्यावर संतापलेल्या मतदाराने शिक्षा म्हणून स्वतःचंच बोट कापून टाकलं!

उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर मतदारसंघात हा विचित्र प्रकार घडला आहे. चुकून विरोधी पक्षासमोरील बटण दाबल्याने त्याचं मत वेगळ्या पक्षाला गेलं. यामुळे तो निराश झाला. त्याच भरात त्याने आपलं बोट कापून टाकलं. पवन वर्मा असं या मतदाराचं नाव असून तो शिक्रापूर येथील अब्दुल्लापूर हुलासन या गावात राहतो.

नेमक प्रकरणं काय?

लोकसभा निवडणुकांसाठी 11 एप्रिलला पहीला तर 18 एप्रिलला दुसऱ्या टप्प्यातील मतदान झाले आहे.

देशभरातील 95 मतदारसंघांमध्ये मतदान पार पडले.

शिक्रापूर येथील अब्दुल्लापूर हुलासन गावात राहणाऱ्या पवनला वर्मानेही यावेळी मतदान केले.

उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर मतदारसंघात त्याने मतदान केलं आहे.

चुकून विरोधी पक्षाच्या समोरील बटण दाबल्याने त्याचे मत चुकीच्या उमेदवाराला पडले.

पवन यामुळे निराश होता याचे प्रायश्चित म्हणून त्याने स्वत:चे बोट कापले आहे.

उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर मतदारसंघात हा विचित्र प्रकार घडला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *