Thu. May 19th, 2022

‘कार्यकर्ते, मतदारांनी आमच्यावर विश्वास दाखवला’ – रोहित पवार

कर्जत नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला घवघवीत यश मिळाल्यामुळे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने एकत्र ही निवडणूक लढवली असून विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक झाली असल्याचे रोहित पवार म्हणाले.

कर्जत शहरात जाऊन नागरिकांचे विषय समजून घेत आम्ही ही निवडणूक लढवली असून नागरिकांनी आम्हाला योग्य प्रतिसाद दिला आहे. दरम्यान या निवडणूकीमध्ये कार्यकर्ते आणि मतदारांनी जसा विश्वास आमच्यावर दाखवला आहे, त्या सर्वांचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी मनापासून आभार मानले आहेत. तसेच ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवून आम्ही यशस्वी झाले असल्याचे कर्जतचे आमदार रोहित पवार म्हणाले आहेत.

कर्जत नगरपंचाययमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस १२ जागांवर विजयी झाला असून काँग्रेसने ३ जागांवर बाजी मारली आहे. तर भाजपला अवघ्या २ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने कर्जत नगरपंचायतवर विजय मिळवला आहे.

1 thought on “‘कार्यकर्ते, मतदारांनी आमच्यावर विश्वास दाखवला’ – रोहित पवार

  1. Hi, i think that i saw you visited my web site so i came to “return the favor”.Im trying to find things to improve my website!I suppose its ok to use some of your ideas!! Have you considered promoting your blog? add it to SEO Directory right now 🙂 Have you considered promoting your blog? add it to SEO Directory right now 🙂

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.