Fri. Aug 12th, 2022

विधानपरिषदेच्या १० जागांसाठी मतदान

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे ही निवडणूक चांगलीच चुरशीची होणार आहे. विधानपरिषदेच्या दहाव्या जागेसाठी भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना होणार आहे.

विधान परिषदेच्या १० जागांसाठी एकूण २४६ आमदारांनी आतापर्यंत मतदान केले आहे. भाजपच्या १०४ आमदारांनी मतदान केले. तर राष्ट्रवादीच्या ४९ आमदारांचे आणि काँग्रेसच्या ४४ आमदारांचे मतदान पूर्ण झाले आहे. तसेच, शिवसेनेच्या सर्व आमदारांचे मतदान पूर्ण झाले आहे.

महाविकास आघाडीचे नेते उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अजित पवार, काँग्रेसचे अशोक चव्हाण, शिवसेनेचे अनिल परब यांनी आमदारांना मार्गदर्शन केले आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनात तळ ठोकला असून मुख्यमंत्र्यांनी शिवसेना आमदारांना मार्गदर्शन केले आहे. मतदानासाठी सेना आमदारांचे ५ गट करण्यात आले आहेत. तसेच फडणवीसांनीही आमदारांना मार्गदर्शन केले आहे.

दरम्यान, विधानपरिषदेच्या दहाव्या जागेसाठी भाजपचे प्रसाद लाड आणि काँग्रेसचे भाई जगताप यांच्यात लढत होणार आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून चंद्रकात हंडोरे आणि भाई जगताप रिंगणात उतरले आहेत. या निवडणुकीत मुख्य लढत भाई जगताप विरुद्ध प्रसाद लाड अशी आहे. त्यामुळे निवडणूकीत भाई जगताप यांना विजयी करण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करत आहे. तसेच भाजपचे उमेदवार प्रसाद विजयी होण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस प्रयत्न करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.