Sun. Jul 5th, 2020

आज दिल्ली विधानसभा निवडणुकासाठी मतदान

राजधानी दिल्लीमध्ये आज दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी (Delhi Election) मतदान होत आहे. ही निवडणूक केंद्रात सरकार असणाऱ्या भाजप आणि दिल्लीत सत्ता असणाऱ्या ‘आप’ यांच्यात प्रतिष्ठेची लढाई आहे. तर काँग्रेसही मैदानात पूर्ण तयारीनिशी उतरलीय.

दिल्लीमध्ये विधानसभेच्या एकूण 70 जागा आहेत. यासाठी 672 उमेदवार उभे आहेत.

दिल्लीतील एक कोटी पेक्षा जास्त मतदारांची नोंदणी झाली आहे.

गेल्या निवडणुकीत दिल्लीमध्ये मोदींची लाट असतानाही आम आदमी पार्टीने बाजी मारली होती. 70 पैकी थेट 67 जागांवर आपने झेंडा फडकवला होता. तर भाजपला जेमतेम 3 जागा मिळाल्या होत्या. यावेळी दिल्लीमधील शाहीनबाग येथे सुरू असलेल्या आंदोलनांचे पडसाद मतदानावर उमटण्याची शक्यता आहे. एकीकडे भाजपसाठी देशभरातील भाजपचे नेते, इतर राज्यांतील आजी-माजी मुख्यमंत्री प्रचारात उतरले होते. पंतप्रधान मोदीदेखील दिल्लीच्या निवडणुकीसाठी प्रचाराला उभे होते. त्याचवेळी दिल्लीतील सत्ताधारी आपचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे मात्र आपण गेल्या 5 वर्षांत केलेल्या कामाच्या जोरावर पुन्हा निवडून येऊ असं विश्वासाने म्हणत आहेत. त्यामुळे अटीतटीच्या लढतीत दिल्लीची किल्ली कुणाकडे जाणार हे 11 तारखेलाच समजेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *