Fri. Jul 3rd, 2020

मतदानासाठी थेट लंडनहून नाशिकमध्ये !

लोकसभेच्या चौथ्या टप्यात उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिमबंगाल, महाराष्ट्र, झारखंड, ओडिशा, मध्य प्रदेश, राजस्थान, जम्मू-कश्मीरसमवेत 9 राज्यात 71 जांगावर मतदान होत आहे. चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रात उर्वरित 17 लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. मतदानासाठी युवक वर्ग उत्साही आहे. मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी मतदारांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. मोठमोठ्या सेलिब्रेटींनी सुद्धा मतदान केले आहे. वृद्धांनी देखील मतदानामध्ये चांगला सहभाग नोंदवला आहे. नाशिकमध्ये मतदान करण्यासाठी परदेशातून युवक मतदान करण्यासाठी आला आहे. त्याने लंडन वरून येऊन आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

परदेशातून येवून मतदान

नाशिकमध्ये मतदान करण्यासाठी परदेशातून सुद्धा काही युवक महाराष्ट्रात आले आहे.

तुषार खैरे हा युवक देखील थेट लंडन वरून येऊन आज नाशिकमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला.

मतदान करण्यासाठी तुषार हा लंडन वरून काल नाशिकमध्ये दाखल झाला होता आणि आज त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

गेल्या काही वर्षापासून  तुषार हा लंडन मध्ये शिक्षण घेत आहे.

मतदानाचं महत्त्व ओळखून त्यांनी आपलं कर्तव्य बजावण्यासाठी भारतात आला होता.

मतदान केल्यानंतर मी खूप आनंदी आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *