Wed. Dec 8th, 2021

चौथ्या टप्यातील प्रचारतोफा थंडावल्या, उद्या मतदान

लोकसभेच्या चौथ्या टप्यात उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिमबंगाल, महाराष्ट्र, झारखंड, ओडिशा, मध्य प्रदेश, राजस्थान, जम्मू-कश्मीरसमवेत 9 राज्यात 71 जांगावर मतदान होणार आहे. हा टप्पा भाजपसाठी अंत्यत महत्वाचा आहे. २०१४ मध्ये या 71 जागांपैकी 45 जागांवर भाजपने विजय मिळवला होता. तर घटक दलासोबत 59 जागा मिळवल्या होत्या. मात्र या राज्यात सर्वत्र समिकरण बदललले आहे. राजस्थान, मध्यप्रदेशमध्ये कॉग्रेसची सत्ता आली आहे तर उत्तर प्रदेशमध्ये सपा-बसपाने भाजपपुढं कडव आव्हान उभ केलं आहे.चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रात उर्वरित 17  लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. यात मुंबईतील सर्व सहा मतदारसंघांचा समावेश असणार आहे. नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, उत्तर मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, उत्तर मध्य मुंबई, ईशान्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, मावळ, शिरूर, शिर्डी या मतदार संघात मतदान होत आहे. मतदानासाठी धडाडणाऱ्या प्रचारतोफा शनिवारी संध्याकाळी थंडावल्या आहेत.

लोकसभा निवडणूक- चौथ्या टप्याचं मतदान

चौथ्या टप्यात 29 एप्रिलला मतदान होणार आहे.9 राज्यात 71 जागांवर मतदान होणार आह
महाराष्ट्र- 17
उत्तर प्रदेश- 13
राजस्थान-13
पश्चिम बंगाल- 08
मध्य प्रदेश-06
ओडीशा- 06
बिहार- 5
झारखंड-03
जम्मू आणि काश्मीर- 01  (अनंतनाग मतदारसंघासाठी मतदान होणार)

महाराष्ट्रात 17 मतदारसंघात मतदान

नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे,

उत्तर मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, उत्तर मध्य मुंबई, ईशान्य मुंबई,

दक्षिण मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, मावळ, शिरूर, शिर्डी या मतदारसंघात मतदान होणार आहे.

एकुण मतदार- 3 कोटी 11 लाख 92 हजार 823

पुरुष मतदार- 1 कोटी 66 लाख 31 हजार

महिला मतदार- 1 कोटी 45 लाख 59 हजार

तृतीयपंथी मतदार- मुंबई उत्तर मतदारसंघात ३32

एकुण विधानसभा मतदारसंघ- 102

मतदान केंद्र- 33 हजार 314

एव्हीएम मशीन्स- 1 लाख 7 हजार 995

व्हीव्हीपॅट यंत्र- 43 हजार 309

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *