Tue. Jun 15th, 2021

अन्नदात्याची व्यथा

काळी माती, जगावेगळी नाती
तिला कसतो, घाम गाळतो..तो आपला अन्नदाता
कधी अस्मानी तर कधी सुल्तानी संकटात सापडतो
तरीही कर्जाचा बोजा वाहतो
उत्पन्नातून 4 पैसे मिळतील या आशेवर जगतो
सरकारकडून ना सुविधा, ना हमीभाव
संघर्ष, आसूड यात्रेतून विरोधकांचा नुसताच भाव
पिचलेल्या शेतक-याची कोण ऐकणार व्यथा?
सरकार फक्त सांगतंय प्रयत्नांची कथा
शेतक-यांचे प्रश्न काही सुटेना
शितल, स्वातीसारख्या पोरींना बापाचं ओझं सहन होईना
लग्न, हुंडा सामाजिक तेढ काही पाहवेना
मुख्यमंत्र्यांचं आवाहन धीर धरा..योग्य वेळी कर्जमाफी करु
जरा यूपीतल्या सातबारा को-याचा अभ्यास तरी करुन बघू
बळीराजा रोजच देतोय जीवन मरणाची परीक्षा
शेतकरी कर्जमाफीतून जीवनदान मिळेल हीच अपेक्षा!

वृषाली यादव
अँकर, जय महाराष्ट्र न्यूज चॅनेल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *