Sun. Apr 5th, 2020

अभिनेत्री गायत्री दातार हिला अश्लील मेसेज!

झी मराठी चॅनलवरील ‘तुला पाहते रे’ या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतलाय. या मालिकेतील सुबोध भावे यांच्या विक्रांत सरंजामे या व्यक्तिरेखेसोबत गाजलेली व्यक्तिरेखा म्हणजे अभिनेत्री गायत्री दातार हिने साकारलेली ‘ईशा निमकर’! या भूमिकेमुळे गायत्री दातारचं फॅन फॉलोइंग कमालीचं वाढलंय. मात्र याचबरोबर तिला अनेकदा troll ही केलं गेलं. मात्र नुकताच social media वर एक अत्यंत अश्लील मॅसेज आलाय.

एका महिलेने गायत्रीच्या फेसबुक अकाऊंटवर अश्लील मेसेज पोस्ट केला.

या मेसेजचा स्क्रिनशॉट गायत्रीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केला आणि इतक्या अश्लील पातळीवर विचार करणाऱ्यांना जाब विचारलाय.

‘नुकताच हा मेसेज फेजबुक पेजवर वाचला आणि मला धक्काच बसला. हे असं बोलण्याची गरज आहे का ? हे योग्य आहे का?,’ असं गायत्रीने लिहिलंय.

पुढे तिने म्हटलं की, मी अशा मेसेजची प्रसिद्धी करत नाहीये. पण इथे त्या व्यक्तीचा फेसबुक अकाऊंट आहे. तिच्याविरोधात आवाज उठवा. आपली ताकद दाखवूयात, अशा शब्दांत गायत्रीने चाहत्यांना आवाहन केलं आहे.

आक्षेपार्ह मेसेज करणाऱ्या महिलेचं अकाऊंट खरं आहे की खोटं हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र केतकी चितळेनंतर गायत्री दातार अशा अश्लील मॅसेजेसची शिकार झाली आहे. असे घाणेरडे मॅसेज करणारी प्रोफाईल्स बंद करण्यासाठी सर्वांनी हातभार लावायला हवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *