Mon. Jun 1st, 2020

VVPATमधील पावत्यांची पडताळणी करावी; 22 विरोधी पक्षांची ECकडे मागणी

लोकसभा निवडणुकीच्या निकालाची वाट राजकीय पक्षांसह नागरिकही पाहत असताना 22 विरोधी पक्षांच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाची भेट घेऊन व्हीव्हीपॅटची पडताळणी व्हावी अशी मागणी केली आहे. EVMमध्ये छेडछाड होत असल्याचा मुद्दा विरोधकांनी अनेकदा उपस्थित केला आहे. या मु्द्द्यावरून मतमोजणीपूर्वी काही मतदान केंद्रावरील व्हीव्हीपॅट पावत्यांची पडताळणी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

नेमकं प्रकरण काय ?

EVM मध्ये छेडछाड होत असल्याचा मुद्दा विरोधकांनी अनेकदा उपस्थित केला आहे.

यामुळे 22 विरोधी पक्षांच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाची भेट घेतली आहे.

मतमोजणी करण्यापूर्वी मतदान केंद्रावरील व्हीव्हीपॅटच्या पावत्यांची पडताळणी व्हावी.

तसेच पडताळणी करताना काही अढळल्यास व्हीव्हीपॅटची संपूर्ण पडताळणी करण्यात यावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे.

EVM ची छेडछाड झाल्याची तक्रार आल्या असून निवडणूक आयोगाने त्वरीत यावर पाऊल उचलावे अशीही कॉंग्रेस पक्षाने मागणी केली आहे.

एक्झिट पोल जाहीर झाल्यानंतर भाजपाची सत्ता पुन्हा स्थापन होणार असल्याची चिन्ह दिसू लागल्यामुळे विरोधकांनी पुन्हा प्रश्न उपस्थित केला आहे.

त्यामुळे निवडणूक आयोगा यासंदर्भात आज बैठक घेणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *