Wed. Jul 28th, 2021

मतमोजणी करायची नसेल तर व्हीव्हीपॅटचा वापर कशाला ? – जितेंद्र आव्हाड

50 टक्के व्हीव्हीपॅट मशीन्स तपासण्यासाठी विरोधकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळल्यामुळे विरोधकांना मोठा धक्का बसला आहे. तसेच सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या खंडपिठाने हस्तक्षेप करणार नाही असाही निर्णय दिला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्हीव्हीपॅटमधील मतांची मोजणी करायची नसेल तर ते वापरलं कशाला ? असा प्रश्न उपस्थित केला.

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड ?

50 टक्के व्हीव्हीपॅट मशीन्स तपासण्यासाठी विरोधकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळ्यामुळे विरोधक संतप्त झाले आहेत.

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या खंडपिठाने ही याचिका फेटाळली आहे.

मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्हीव्हीपॅटसंदर्भात मत व्यक्त केले आहे.

मतांची मोजणी करायची नसेल तर ते व्हीव्हीपॅटचा वापर कशाला केला ? असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.

व्हीव्हीपॅटबद्दल आलेला निर्णय अत्यंत दुर्दैवी असल्याचे आव्हाड म्हणाले.

तसेच व्हीव्हीपॅटच्या माध्यामाने मतमोजणी झालीच पाहिजे.

50 टक्के नव्हे 100 टक्के व्हीव्हीपॅटची तपासणी झालीच पाहिजे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *