वेटर्सनी ग्राहकालाच कपडे काढून नाचायला लावलं!

मुंबईमध्ये पुन्हा एकदा डान्स बार सुरू झाले आहेत. अनेक ग्राहक बारबालांचा डान्स पाहायला जातात. मात्र चेंबूर येथील एका बारमध्ये चक्क वेटर्सनी एका ग्राहकालाच कपडे काढून नाचायला लावल्याची घटना घडली आहे. यासंदर्भात ‘राज पंजाब’ या बारविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका स्थानिक वृत्तवाहिनीने यासंदर्भात बातमी दिली आहे.

काय घडलं नेमकं?

डान्स बारवरील बंदी सुप्रीम कोर्टाने उठवली आहे.

त्यामुळे मुंबईमध्ये पुन्हा मोठ्या प्रमाणावर डान्सबार सुरू झाले आहेत.

चेंबूर येथील ‘राज पंजाब’ या बारमध्ये मात्र बाराबालांऐवजी एका ग्राहकावरच नाचायची नामुष्की ओढावली.

या ग्राहकाने बारमध्ये खानपान केल्यावर जेव्हा बिल द्यायची वेळ आली, तेव्हा पैसे नसल्याचं सांगितलं.

यावर चिडून बारमधील वेटर्सनी या ग्राहकाला मारहाण केली.

त्याचे कपडे काढले आणि त्याला चक्क साईबाबांच्या एका गाण्यावर नाचायला लावलं.

ग्राहकाचा अशा प्रकारे छळ केल्याबद्दल या पीडित ग्राहकाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनीही या बार आणि बारमधील वेटर्सविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

यातील एका वेटरला अटकही करण्यात आली आहे. इतर वेटर्सनाही अटक करावं अशी मागणी आता पीडित ग्राहकाने केली आहे.

Exit mobile version