Wed. Jun 16th, 2021

दिवंगत संगीत दिग्दर्शक वाजिद खानच्या पत्नीनं संपत्तीसाठी ठोठावला न्यायालयाचा दरवाजा

बॉलिवूडमधील दिवंगत संगीत दिग्दर्शक आणि गायक वाजिद खानची पत्नी कमालरुख खानने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. कमालरुख खानने वाजिद खानच्या कुटुंबीयांवर अनेक आरोप केले आहेत. खान कुटुंबीयांनी तिला संपत्तीतून वगळल्याचा आरोप तिने केले आहे. शिवाय गेल्या ६ वर्षांपासून कमालरुख ही कुटुंबीयांपासून वेगळी राहते आणि तिने यापूर्वी तिच्या सासऱ्यांवर देखील अनेक आरोप केले होते. वाजिद खानच्या निधनापूर्वी कमालरुखने घटस्फोटासाठी अर्ज केला होता. पण त्यांचा घटस्फोट होऊ शकला नाही. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर दिर साजिद खान आणि त्यांची आई यांच्या एकूण संपत्तीचा तपशील घेण्यात आला आहे. या तपशीलातून काही खुलासे झाले आहे. तब्बल १६ कोटी रुपयांच्या प्रॉपर्टीमध्ये वाजिद खान काही प्रसिद्ध आर्टिस्टच्या पेंटिगचा मालक असल्याचं समोर आलं आहे. या पेंटिंगची किंमत जवळपास ८ कोटी रुपये असल्याचे म्हटले जात आहे. तसेच या पेंटिंगमध्ये एफएफ हुसैन यांचे पेंटिंग आणि स्केच आहेत. त्याच बरोबर वीएस गायतोंडे, तैय्यब मेहता, एसएच रजा यांचे एक एक पेंटिग आणि स्वामीनाथ यांचे दोन पेंटिंग आहेत. दरम्यान, कमालरुख यांचे वकील बहरैज ईराणी यांना पेंटिंगशी तिचे काही भावनिक नाते आहे का असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले, ‘कुटुंबीयांसाठी या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्यांना आर्थिक आणि भावनिक महत्व आहे. आज कमालरुख विधवा आहे आणि या सर्व गोष्टींवर अवलंबून आहे. इतकच नव्हे तर वाजिद त्याच्या मुलीला शिक्षणासाठी अमेरिकेत पाठवू इच्छित होता. पण अचानक त्याचे निधन झाल्यामुळे कुटुंबीय पाठिंबा देत नाहीत. या पैशांनी कमालरुख यांना मदत होईल.’ असं सांगितल्यात आलं आहे. ईराणी यांच्या मते, ‘पती-पत्नीमध्ये झालेल्या घटस्फोटानंतर पालक मुलांना कसे घटस्फोट देऊ शकतात? मुलांच्या अधिकारावर त्याचा परिणाम होत नाही. वडिलांच्या संपत्तीवर त्यांचा अधिकार असतो.’ असं त्यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *