नवाब मलिकांच्या आरोपाला वानखेडेंचे उत्तर

ड्रग्जपार्टी प्रकरणी एनसीबीने आर्यन खानला अटक केले आहे. आर्यन ड्रग्जप्रकरणी राज्यात सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यात अनेक प्रत्यारोप सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रसचे प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडेबाबत गौप्यस्फोट केला. त्यावर आता वानखेडेंनी मोजक्या शब्दात उत्तर दिले आहे.
नवाब मलिकांनी केलेल्या आरोपावर समीर वानखेडे म्हणाले, ‘२००६ मध्ये माझे लग्न झाले होते आणि त्यानंतर कायदेशीररित्या घटस्फोट घेऊन मी दुसरे लग्न केले. ज्या महिलेसोबत मी संसार केला नाही त्या महिलेचा फोटो वापरून कुटुंबावर हल्ला केला जातोय. माझ्यावर कितीही शिंतोडे उडवायचे ते उडवा. तपास भरकटवण्याचा प्रकार आहे. अतिशय खालच्या दर्जाची चिखलफेक सुरू आहे.’
नवाब मलिकांचा आरोप
नवा मलिकांनी समीर वानखेडे यांच्या लग्तनातला फोटो शेअर करत ‘पहचान कौन’ असे लिहिले. तसेच मलिकांनी वानखेडेंचे जातप्रमाणपत्रसुद्धा शेअर केले आणि लिहिले ‘यहाँसे शुरु हुआ फर्जीवाडा’. वानखेडेंच्या जातप्रमाणपत्रात समीर दाऊद वानखेडे असा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे वानखेडेंनी गैरप्रकाराने नोकरी मिळवली असल्याचा आरोप नवाब मलिकांनी वानखेडेंवर केला आहे.