Tue. Dec 7th, 2021

हृतिक-टायगरच्या WAR ची पहिल्याच दिवशी ‘इतकी’ कमाई!

“वॉर” या चित्रपटाने प्रीबुकिंगमध्येच म्हणजेच रिलीज होण्याच्या आधीच 32 कोटी कमावले होते.

बॉलिवूडमध्ये फिजिक आणि डान्स या दोन पातळ्यांवर एकमेकांना टक्कर देऊ शकणारे अभिनेते म्हणजे हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ ‘वॉर’ सिनेमात एकत्र आले आहेत. War सिनेमा 2 ऑक्टोबर रोजी रिलीज झालाय.सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच  प्रेक्षकांची सिनेमाबद्दलची उत्सुकता वाढलेली दिसून आली होती. त्यामुळे हॉलिवूडच्या तोडीस तोड असणाऱ्या या सिनेमाला बंपर ओपनिंग मिळण्याची शक्यता होतीच.

पहिल्याचं दिवशीच धमाकेदार कमाई

वॉर चित्रपटाच्या पहिल्याच दिवशी 50 कोटी रुपयांची ओपनिंग केली आहे. हा सर्वात मोठा रेकॉर्ड आहे.

WAR  ने ‘जोकर’ आणि ‘सईरा नरसिम्हा राव’  या सारख्या सिनेमांना  मागे टाकलंय.

या चित्रपटानी पहिल्याच दिवशी 50  कोटी कमावले आहे. विशेष म्हणजे 55 कोटीची कमाई ही फक्त हिंदी भाषेमध्येच केली आहे.

वॉर हा  चित्रपट इतर भाषामध्ये सुद्धा रिलीज झाला होता. त्या सर्वाची कमाई पाहता वॉर चित्रपटाने एकत्रित 55 कोटी कमावले आहेत, ते ही पहिल्या दिवशी सिनेमाच्या ओपनिंगला.

हा चित्रपट रिलीज झाला तेव्हाच प्रेक्षकांनी या चित्रपटाबाबतीत उत्सुकता दाखवली होती.

वॉर या चित्रपटाने प्रीबुकिंगमध्येच म्हणजेच रिलीज होण्याच्या आधीच 32 कोटी कमावले होते.

ह्रतिक रोशन आणि टायगर श्रॉफचा वॉर हा सिनेमा 3800 Theaters  मध्ये रिलीज झाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *