Thu. Sep 23rd, 2021

…आणि तिची मृत्यूशी झुंज अखेर संपली

हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी

हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली. सोमवारी सकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी ऑरेंज सिटी हॉस्पिटल मध्ये तिचा मृत्यू झाला. गेल्या सात दिवसांपासून पीडित महिला मृत्यूशी झुंज देत होती. तिच्या मृत्यूमुळे कुटूंबियांवर शोककळा पसरली आहे.

पहाटे 4च्या सुमारास ह्रदय विकाराचा झटका आला.श्वास घेण्यासाठी अडथळा आल्याने महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. गेली चार दिवस महिलेची प्रकृती नाजूक असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले होते. रविवारी पीडितेवर चौथी शस्रक्रियाही करण्यात आली होती.  

“मारेकऱ्यांना आमच्या हवाली करा. ज्या वेदना माझ्या मुलीला त्याचं वेदना त्या आरोपीला व्हायला पाहिजे. निर्भायावर अत्याचार करणाऱ्यांसारख नको, आम्हाला लवकरात लवकर न्याय हवा.” अशी संतप्त प्रतिक्रिया पीडित मुलीच्या वडिलांनी दिली.

पीडित महिला हिंघणघाटच्या एका शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होती. विकी नगराळे नावाच्या तरूणाने एकतर्फी प्रेमातून महिलेला पेट्रोल टाकून जाळले. यात हि महिला गंभीररित्या भाजली. या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *