हिंगणघाट प्रकरण : निषेधार्थ मोर्चा आणि वर्धा बंदचे आवाहन

हिंगणघाटमध्ये घडलेल्या घटनेबद्दल राज्यासह देशभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. हिंगणघाटमधील शिक्षकेवरील हल्ल्याच्या निषेधार्थ वर्धा बंदची हाक देण्यात आली आहे.

पीडितेला लवकरात लवकर न्याय देण्यासाठी आज वर्धा बंद आणि मोर्च्याचे आयोजन केले आहे. या मोर्च्यासाठी विद्यार्थीनी, सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतला आहे.

वर्ध्यामधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून या मोर्च्याला सुरुवात झाली आहे.

नागरिक हाताला काळी पट्टी बांधून मोर्च्यात सहभागी झाले आहे. पीडितेला न्याय देण्याची मागणी असलेले बॅनर हातात घेतले आहेत.

तसेच या मोर्च्यात सामील होण्याचे आवाहनही सामाजिक संघटनांतर्फे करण्यात आले आहे.

हिंगणघाट येथे एकतर्फी प्रेमातून विकेश नगराळे या विकृताने ३ फेब्रुवारीला प्राध्यापिकेवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान या शिक्षिकेवर नागपुरच्या रुग्णालयात उपचार केले जात आहे.

आरोपीला पेट्रोल टाकून जाळा, अशी संतप्त प्रतिक्रिया पीडितेच्या नातेवाईकांनी दिली आहे.

माझ्या मुलीला होत असणारा त्रास मला पाहवत नाहीये. माझ्या मुलीची अशी अवस्था करणाऱ्यालाही जिंवत जालण्यात यावं, त्यालाही वेदना व्हायला हव्या, अशी प्रतिक्रिया पीडितेच्या आईनी दिली आहे.

दरम्यान राज्यमंत्री बच्चू कडूंनी हिंगणघाट जळीत पीडितेच्या कुटुंबीयांची नागपुरात भेट घेतली. यावेळी त्यांनी प्रकृतीची केली विचारपूस केली.

तसेच आमदार प्रणिती शिंदे यांनीही याप्रकाराबाबत संताप व्यक्त केला आहे. हैदराबादप्रमाणे दोषींना तात्काळ शिक्षा द्यावी.

किंवा ९० दिवसांमध्ये खटला निकालात काढून फाशी देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

Exit mobile version