Jaimaharashtra news

वर्ध्यात ११ ठिकाणी होणार ऑक्सिजन निर्मिती

वर्धा जिल्ह्यातील वाढती रुग्णसंख्या पाहता ऑक्सिजन कमी पडू नये याची खबरदारी घेतली जात आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा रोजचा सरासरी आकडा ५०० च्यावर आहे. कोरोना रुग्णांचा वाढता आकडा पाहता आता जिल्ह्यात ऑक्सिजनसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. ग्रामीण तसेच उपजिल्हा रुग्णालयात असे एकूण ११ ठिकाणी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारले जाणार आहेत.

दुसऱ्या लाटेत एवढी बिकट परिस्थिती असताना येणाऱ्या तिसऱ्या लाटेचे काय असा प्रश्न सर्वांसमोर उभा आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत ऑक्सिजनची कमतरता निर्माण होऊ नये, ऑक्सिजनअभावी रुग्णाचा मृत्यू होऊ नये यासाठी हे प्रयत्न केले जात आहेत.

Exit mobile version