Wed. Oct 27th, 2021

हिंदू सहिष्णू आहे, पण, दुर्बल नाही – देवेंद्र फडणवीस

एमआयएमचे माजी आमदार वारीस पठाण यांनी एका सभेत चिथावणीखोर वक्तव्य केलं होतं. या विधानानंतर सर्वच स्तरातून वारीस पठाण यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला.

दरम्यान आता या वारीस पठाणच्या विधानावरुन विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?

निंदणीय अशा प्रकारचं भाषण आहे. वारीस पठाण यांनी हे लक्षात ठेवायला हवं.

या देशात १०० कोटी पेक्षा अधिक हिंदु असल्यामुळेच कोणालाही बोलण्याचं अधिकार आहे.

अशाप्रकारे मुस्लिम राष्ट्रात अशा प्रकारचं विधान केलं असतं, तर त्या ठिकाणी काय अवस्था झाली असती, हे त्यांनी लक्षात घ्यायला हंव.

मात्र भारत हा सहिष्णू देश आहे. हिंदु समाज सहिष्णु आहे.

पण हिुंदु समाजाच्या सहिष्णुतेला कोणी हिंदु समाजाची दुर्बळता समजत असेल, तर तो मुर्खपणा ठरेल.

त्यामुळे हे लक्षात घ्यायला पाहिजे, या ठिकाणी अशा प्रकारचं वक्तव्य खपवून घेतलं जाणार नाही.

वारीस पठाण यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांनी माफी मागायला हवी. तसेच राज्य सरकारने त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

काय म्हणाले होते वारीस पठाण ?

१५ कोटी आहोत. पण १०० कोटींना भारी आहोत. हे लक्षात ठेवा. असं आपत्तिजनक विधान वारीस पठाण यांनी केलं होतं.

दरम्यान या विधानामुळे वारीस पठाण यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तसंच त्यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई देखील करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *