Fri. Mar 5th, 2021

वारीसाठी पुरेश्या बस देत नाही म्हणून वारकऱ्यांचं ठिय्या आंदोलन

जय महाराष्ट्र न्यूज, बीड

बीडमध्ये बसस्थानकाच्या मुख्य गेटवर वारकऱ्यांनी ठिय्या आंदोलन करत बाहेर जाणाऱ्या सर्व बस रोखल्या होत्या. दर महिन्याला वारकरी पंढरपूर ला वारीसाठी जात असतात मात्र प्रत्यक वेळी त्यांना बीड डेपो लवकर बस उपलब्ध करून देत नाही.

 

बसची मागणी केली तरी कोणी नीट उत्तर देत नाही त्यामुळे वारकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत ठिय्या आंदोलन केलं. दीड तास वारकऱ्यांनी बस्थानकाच्या बाहेर जाणाऱ्या गाड्या अडवून धरल्या होत्या. प्रत्येक वारीला वेळेवर गाडी देण्याच्या आश्वासन नंतर आंदोलन मागे घेण्यात आलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *